माझी बहिण निबंध Best Essay on My Sister in Marathi: कुटुंबातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे बहिण! मला देखील एक मोठी बहीण आहे आणि ती खूप गोड आहे. ती अगदी शांत, साधी आणि आनंदी स्वभावाची आहे. तिचे नाव अनन्या आहे, मी तिला प्रेमाने अनु दीदी म्हणतो. माझ्यापेक्षा 5 वर्षांनी ती मोठी आहे. तिने हिंदी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. आम्हा 4 भावंडांपैकी ती सर्वात मोठी आहे. त्यामुळे सर्वजण तिच्यावर विश्वास ठेवतात आणि तिचा आदर देखील करतात. माझे माझ्या बहिणीवर खूप जास्त प्रेम आहे. त्यामुळे मी असे मानतो की प्रत्येकाला एक बहिण असलीच पाहिजे, मग ती मोठी असो किंवा छोटी!
माझी बहिण निबंध Best Essay on My Sister in Marathi
मला जेव्हा कधी गरज असते तेव्हा माझ्यासोबत तो नेहमी उभी असते. चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी याविषयी ती मला सतत समजावून सांगते. मला स्वतः बद्दल जितके माहिती नाही तितके जास्त माझ्या बहिणीला माझ्याविषयी माहिती आहे. आईच्या अनुपस्थिती मध्ये माझ्यावर आई सारखी माया आणि आईसारखी काळजी माझी बहीण घेते. माझ्याकडून चुका झाल्यानंतर मी तिच्या मोठा असण्याचा फायदा देखील वाचण्यासाठी घेतो. कधी कधी ती माझ्यासोबत एखाद्या मैत्रिणी सारखे बोलते.
अनेकदा आम्ही सोबत शॉपिंग साठी देखील जातो. माझ्यासाठी माझी बहीण एक चांगली मार्गदर्शक आणि मैत्रीण देखील आहे. कुठल्याही प्रकारे संकोच न करता मी तिच्याशी सर्व गोष्टी बोलू शकतो. माझ्या प्रत्येक कामासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ती सदैव सोबत असते. माझे प्रोजेक्ट्स बनविण्यासाठी देखील ती मदत करते. आईच्या मारपसून देखील अनेकदा मला ती वाचवते. माझे मत बाबांपर्यंत पोहोचवून ते पटवून देण्याचे काम पण ती करते.
दीदी आता शिक्षण पूर्ण करून आईला घरकामात मदत करत असते. आम्हाला दीदींच्या हातचे जेवण खूप आवडते. माझी बहिण ही जगातील सर्वात जास्त गोड बहिण आहे. आजपर्यंत कधीही तिला हट्टी बनलेले किंवा कधीही रागावलेले तिला मी बघितलं नाही. तिचे स्मितहास्य तिला सर्वांसोबत जोडून ठेवण्यासाठी मदत करते. तिच्यासोबत स्कूटी वर फिरण्याची मजा देखील वेगळीच आहे. वाचन आणि लेखन करण्यात ती कायम आघाडीवर असते. शाळेत देखील सांस्कृतिक कार्यक्रमात ती नेहमी आवडीने भाग घेते. प्रत्येक कामात अगदी निपुनता ती दाखवते. जबाबदारी पार पाडण्याच्या बाबतीत ती कुठेही कमतरता ठेवत नाही. काहीही न बोलता देखिल माझ्या मनातील शब्द तिला समजतात.
दीदी ने आम्हाला सतत एकत्र राहण्यासाठी आणि कधीही खोटं न बोलण्यास शिकविले आहे. दीदी आमच्यासाठी आमच्या आईसारखी आहे. आमच्यासोबत ती मजा देखील करते. संध्याकाळी चहा वेळी आम्ही सर्व जण एकत्र बसून गप्पा मारतो. ती माझ्यासाठी आदर्श आहे. अगदी माझ्या बहिणी प्रमाणे मला देखील लोकांच्या मनात माझे स्थान निर्माण करायचे आहे. त्यासाठी मला आयुष्यात अगदी तिच्यासारखं बनायचे आहे. मला तिला नेहमी आनंदात आणि हसताना बघायचे आहे. माझ्यासाठी माझी बहीण ही सर्वात मोठी हिम्मत आहे. माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर तिच्या मदतीने मी मात करेल. मी माझ्या बहिणीवर खूप प्रेम करतो.