माझे आवडते शिक्षक निबंध Best Essay on My Favourite Teacher in Marathi

माझे आवडते शिक्षक निबंध Best Essay on My Favourite Teacher in Marathi: मित्रानो शिक्षक हा एक जीवनाला कलाटणी देणारा आदर्श व्यक्ती असतो जो मुलाच्या वाढत्या वयात त्यांच्या विकासावर चांगला प्रभाव टाकतो आणि मुलांना दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणारी मूल्ये विकसित करत असतो. शिक्षक हा समाजातील एक आदर्श आणि प्रतिष्टीत व्यक्ती असल्याने तसेच मुलांशी त्यांचा जवळचा संबंध येत असल्याने शाळेत सहसा मुलांना माझे आवडते शिक्षक अशा आशयाचा निबंध लिहायला सांगितले जाते.

माझे आवडते शिक्षक निबंध Best Essay on My Favourite Teacher in Marathi

माझे आवडते शिक्षक निबंध Best Essay on My Favourite Teacher in Marathi

माझे आवडते शिक्षक आम्हाला नेहमीच उपयुक्त आणि मौल्यवान धडे देत असतात आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना जीवनात नेहमी योग्य मार्गावर जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक अश्या दोन्ही विचारांचा योग्य समतोल साधणे हे सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे काम असते. परंतु, जश्या नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे शिक्षक देखील दोन प्रकारचे असतात एक म्हणजे समजूतदार शिक्षक आणि दुसरे म्हणजे कठोर शिक्षक होय.

समजूतदार शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांना शिकवण्याची योग्य पद्धती वापरून शाळेची गुणवत्ता व परिस्थिती सुधारतो. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांनी बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेमुळे काही शिक्षक नेहमीच माणसाच्या लक्षात राहतात. आम्हालाही अशीच एक शिक्षिका होती जी नेहमी माझ्या लक्षात राहील अन ती म्हणजे श्रीमती स्मिता बन्सल मॅडम होय, आमच्या दुसऱ्या इयत्तेच्या कला आणि हस्तकला या विषयाच्या त्या शिक्षिका होत्या. शाळेमध्ये त्या आम्हाला  कला विषय शिकवत असल्या तरी देखील शाळेत आम्हाला आलेल्या कोणत्याही विषयातील अडचणीत श्रीमती स्मिता बन्सल मॅडम नेहमी आम्हाला मदत करत असत. त्या एक अश्या शिक्षिका होत्या की ज्यांच्याकडे प्रत्येक विद्यार्थी कोणत्याही प्रकारच्या सल्ल्यासाठी जात असे.

सर्व विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याची क्षमता त्यांच्यात होती. त्या नेहमी विद्यार्थ्यांना मदत करण्यात तत्पर असत, तसेच त्यांचा स्वभाव अतिशय दयाळू होता. त्यांनी नेहमी प्रत्येक विद्यार्थ्यांना मित्रांसारखेच वागवले आणि त्यांच्यासाठी कायमच वेळ दिला आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना  समजून देखील घेतले. त्यांनी आम्हाला कधीही नकारात्मक विचार न करता नेहमी सकारात्मक विचार करण्यास प्रोत्साहन दिले.मला माझ्या आयुष्यात अशा शिक्षिका मिळाल्याबद्दल  मी त्यांचा खूपच  कृतज्ञ आहे.




About Author: